1BHK flat
Description
माझे घर नाहुर पूर्वेला रेल्वे स्टेशनच्या बाहेर आल्यावर चालत तीन मिनिटाच्या अंतरावर आहे. घराचा एरिया 399 स्क्वेअर फिट (built up) असा आहे.
माझे घर तळ मजल्यावर असून, मागच्या बाजूस स्वतंत्र दरवाजा आहे. त्यामुळे घरासमोर प्रशस्त जागा मोकळी आहे, शेजाऱ्यांचा जरा देखील त्रास होत नाही. घरात कोणतेही शुभ / अशुभ कार्य असल्यास कसलीही अडचण होत नाही.
जमिनीपासून घर उंच असल्यामुळे कितीही मोठा पाऊस आला तरी, पाणी साचत नाही. अगदी 2007 मध्ये जो मुंबईत पाऊस पडला आणि सर्वांच्या घरांमध्ये पाणी शिरले होते, त्यावेळेस सुद्धा येथे पाणी साचले नव्हते. बिल्डिंग 2007 मध्येच तयार झाली आहे.
सोसायटीमध्ये सी.सी. टीव्ही , 2 आणि 4 चाकी वाहनांसाठी पार्किंग, 24 तास पाणी, 24 तास सुरक्षारक्षक व इतर आवश्यक सर्व बाबी आहेत.
बिल्डिंग तळ मजला + सात माळ्याची आहे, त्यामुळे बिल्डिंगला लिफ्ट आहे.
बिल्डिंगला O.C. आहे, त्यामुळे कोणत्याही राष्ट्रीयकृत बँक मधून सुद्धा गृह कर्ज होऊ शकते. व्यवहार 100% White असेल तर उत्तम! माझे स्टेट बँक ऑफ इंडियाचे कर्ज होते, आता संपूर्ण फिटले आहे.
माझ्या घराचा मेंटेनन्स प्रति महिना रुपये 2,200/- असा आहे. मी घराची किंमत 85 लाख (strictly please no negotiable) अशी सांगितली आहे. माझ्या घराचा दरवाजा पूर्वेकडे उघडतो.
*माझे घर स्टेशनच्या जवळ असल्यामुळे चार्टर्ड अकाउंटंट, वकील किंवा छोट्या मोठ्या उद्योग करणाऱ्याना ऑफिस म्हणून अतिशय उत्तम पर्याय आहे.*
*तसेच, लहान कुटुंब किंवा जेष्ठांसाठी देखील अतिशय उत्तम पर्याय आहे.*
Address
-
Country India
-
Province/State Maharashtra
-
City/Town Nahur East
-
Postal code/ZIP 400080
